प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पोथरे ता. करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीन दिवसीय विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नेत्रदान, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीर, विचारदान अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन टायगर ग्रुप, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. तानाजीभाऊ जाधव यांच्या हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून उद्योजक लखन आमटे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक चव्हाण, डाॅ. बालाजी वाघमोडे, नरेंद्र ठाकुर, प्रकाश मामा कोळेकर, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल भाऊ शिंदे, दत्ता भांडवलकर, शुभम बंडगर, पै. ईश्वर साने, पै. सोरटे वस्ताद, रामा डाॅन, पोलिस पाटील समाधान पाटील, कृषी सहाय्यक नितीन जाधव, ग्रामसेवक हरीभाऊ दरवडे, शहाजी झिंजाडे, इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डाॅ. तानाजीभाऊ जाधव म्हणाले की, राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये रक्त साठा कमी पडत आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त पिशवी उपलब्ध होते. हिच सामाजिक बांधिलकी आणि रक्ताची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे अंगद देवकते यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम जोपासला हे कौतुकास्पद आहे. या शिबिरात ७३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट म्हणुन पाण्याचा जार व हेल्मेट तसेच प्रमाणपत्र तानाजी भाऊ जाधव यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या शिबिरात रक्त संकलनाचे काम कुर्डुवाडी येथील कुर्डवाडी ब्लड बॅंकेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी रक्तपेढीचे काम डाॅ. ओमप्रकाश बेलपत्रे, सुशांत गिराम, ऋषी धस, कल्याण गवळी, वृषाली पवार, अर्पिता सातारकर यांनी काम पाहीले.
यावेळी जिवन होगले, माऊली पुराणे ग्रा. सदस्य शांतिलाल झिंजाडे, प्रसाद कुलकर्णी, संतोष भांडं, रणजित शिंदे, अमोल खटके, संभाजी कडू, गोरख गायकवाड, रघुनाथ खटके, विकास मेरगळ, गणेश ढवळे, शंकर सुळ, विठ्ठल भिसे, संतोष येळे, काळू आढाव, सुरेश यादव, मारूती रंदवे, अमोल शिंदे, रवी शिंदे, शरद शिंदे, अविन पाटील, बाळू भांड, शरद खटके, सोमा शिंदे, राम गायतोंडे यांच्यासह आदी ग्रामस्थ तसेच रासप पदाधिकारी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे प्रास्तावित अंगद देवकते यांनी केले तर आभार शहाजी झिंजाडे यांनी मानले.



