रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा पदी अरुणा सरवदे यांची निवड
प्रतिनिधी/आबासाहेब झिंजाडे


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा पदी अरुणा सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. अरुणा सरवदे ह्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून या अगोदर त्यांनी समाजवादी जनपरिषद सोलापूर तालुका महीला अध्यक्षा पदावर अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेले आहे. तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपली भूमिका पार पाडली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले अशा अनेक राष्ट्रीय थोर संत महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरा करण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात. अशा या त्यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यामुळे अरुणा सरवदे यांची सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे. त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की, पक्षाचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोच विण्यासाठी तसेच पक्ष वाढीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे मी काम करण्यासाठी कटिबद्ध आहे.
त्यांच्या निवडीबद्दल अतिशय उत्साहाचे वातावरण असून मित्रपरिवार व सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



