
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील शेलगाव क येथे उद्या संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून उद्या सकाळी १०:०० वा. त्याचे उद्घाटन आमदार संजय शिंदे यांचे शुभहस्ते व उद्योजक भरत अवताडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. या स्पर्धेचा लाभ पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक १११११/- रुपये हे युवा उद्योजक भरत अवताडे यांचे वतीने देण्यात येणार असून द्वितीय पारितोषिक ७७७७/- रुपये चेअरमन स्वप्निल पवार, आ. संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, ग्रामपंचायत सदस्य राहुल कुकडे, सरपंच अशोक काटुळे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तृतीय पारितोषिक ५५५५/- रुपये असून उपसरपंच सचिन वीर व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ढावरे यांचे तर्फे हे बक्षीस देण्यात येणार आहे. चतुर्थ पारितोषिक ३३३३/- रुपये असून श्री. विजय आवटे कृष्णा हायटेक नर्सरी सौंदे यांच्यातर्फे हे पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला दिले जाणारे चषक यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांचेतर्फे दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांना प्रत्येकी १००/- रुपये तसेच सलग ४ षटकार, सलग ३ विकेट यांना प्रत्येकी ५०१/- रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेमध्ये प्रवेश फी ५००/- रुपये असून नाव नोंदणी साठी माऊली शिंदे ७७४५०८०८९२, शिव शंकर शिंदे ७४९८३६३८५९, लहू शिंदे ९७६७२९३५९६, सचिन वीर ९०२१४१०५४८, अमोल पायघन ८६०५३४३१७३ यांचेकडे संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. सदर स्पर्धा शेलगाव (क) येथील माळी वस्ती नं.१ या ठिकाणी होणार आहेत.



