-->
करमाळासामाजिक

इंद्रायणी सोसायटीवर नागेश्वर महाराज शेतकरी सहकारी पॅनेलने सर्व जागा जिंकत वर्चस्व

प्रतिनिधी /गजानन गव्हाणे पाटील

वडगाव शिंदे – काकडे, ता. हवेली येथे नुकत्याच पार पडलेल्या विविध कार्यकारी विकास सोसायटी च्या निवडणुकीत नागेश्वर महाराज शेतकरी सहकारी पॅनेल ने इंद्रायणी विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीत विरोधी पॅनेलचा सुपडा साफ करत सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी उमेश थिटे, सचिव गायकवाड यांनी काम पाहिले.

निवडणुकीपूर्वी २ जागा बिनविरोध आल्याने ११ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. नागेश्वर महाराज शेतकरी सहकारी पॅनेलने माजी उपसरपंच विलास नाथु काकडे, उद्योजक कल्याण (आबा) शिंदे, माजी सरपंच रामभाऊ गुलाब काकडे, माजी सरपंच विजय शिंदे, रमेश काकडे, माजी चेअरमन जयदीप पोपट शिंदे यांच्या नेतृत्वात ११ जागा जिंकत सोसायटी वर आपला झेंडा रोवला. या विजयाबद्दल सर्वच स्तरातून विजयी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन होत आहे. निवडीनंतर गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष करण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :- सर्वसाधारण कर्जदार – खंडू किसन काकडे, बाबा ज्ञानोबा काकडे, युवराज आबाजी काकडे, सुनील तुळशीराम काकडे, कल्याण अंकुश शिंदे, कांतीलाल उत्तम शिंदे, जयदीप पोपट शिंदे, नितीन प्रभाकर शिंदे, सर्वसाधारण महिला – अनुसया सुभाष बारणे, सुमन तुकाराम शिंदे, अनुसूचित जाती जमाती – चंद्रकांत कोंडीबा गायकवाड, ओबीसी – युवराज सदाशिव काकडे (बिनविरोध), वंचित – प्रदीप नारायण चव्हाण (बिनविरोध)

शासनाच्या, जिल्ह्या बँकेच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी जाहीर होणाऱ्या योजना तळागाळातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच शेती अवजारे व इतर शेती पूरक कामांसाठी अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी पॅनल प्रमुख विद्यमान संचालक उद्योगपती कल्याण (आबा) शिंदे यांनी सांगितले.

यावेळी नागेश्वर दिंडीचे कार्याध्यक्ष सदाशिव रामभाऊ काकडे, उपाध्यक्ष बापू वामन काकडे, संचालक अंकुश रामचंद्र काकडे, हरिभाऊ काकडे, सरपंच हेमलता शिंदे, उपसरपंच योगिता शिंदे, माजी सरपंच भरत काकडे, देवराम काकडे, दिलीप काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सोनाली शिंदे, पप्पू शिंदे, उषा काकडे, मच्छिंद्र शिंदे, सुभाष बारणे, कुंडलिक शिंदे, सत्यवान शिंदे, बजरंग शिंदे, माऊली संभाजी काकडे, शहाजी काकडे, सुरेश गुलाब शिंदे, ह.भ.प. गणेश गोविंद शिंदे, किसन रामभाऊ काकडे, सोमनाथ काकडे, ग्रामपंचायत सदस्य भरत विष्णू काकडे, उद्योजक भीमराव शिंदे, उद्योजक संभाजी राजाराम शिंदे, रामभाऊ शिंदे, संजय ज्ञानोबा शिंदे, शिवाजी लक्ष्मण शिंदे, भगवान शिंदे, महेंद्र शिंदे, प्रकाश काकडे, हरीश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण काकडे, सदाशिव बाळासाहेब काकडे, शामकांत गोसावी, उद्योजक सतीश शिंदे, कैलास काकडे, वैभव शिंदे, स्वप्नील शिंदे, ग्रामपंचायत सदस्या शिवानी शिंदे, उल्का शिंदे, दीपाली शिंदे आदी मान्यवर व सोसायटी चे सभासद उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close