प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महेश नानासाहेब मारकड विक्रीकर निरीक्षक मुंबई, दत्तात्रय संजय बदे कर निरीक्षक करमाळा नगर परिषद करमाळा हे होते. तर कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी नोबल स्कुलच्या अध्यक्षा सौ. असादे मॅडम, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे मा. चेअरमन मुकुंद साळुंखे सर व संजय सोनवणे सर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्लोबल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. महेश निकत सर यांनी केले. यापुढेही असेच विद्यार्थी हिताचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी उपस्थित पालकांना नमूद केले. प्रमुख पाहुणे महेश मारकड हे बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सायन्स शाखेची खूप मदत होते. त्यांच्या समवेत असलेल्या करमाळा नगरपरिषद येथे कर निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय बदे यांनी विध्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुकुंद साळुंखे सर यांनी सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक आवड निर्माण करून त्यांची संशोधकवृत्ती जागरूक करणाऱ्या या इन्स्टिट्यूटला शुभेच्छा दिल्या. तर पालक सौ. शिंदे मॅडम यांनी आपली मुले योग्य ठिकाणी शिक्षण घेत असल्याचे बोलून दाखवले. या प्रदर्शनात इयत्ता आठवी ते बारावी वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची प्रात्यक्षिके सादर केली. यात बायोग्यास निर्मिती, जेसीबी मशीन, सूर्यकिरणांपासून वीज निर्मिती, पवनचक्की, मॅजिक दुर्बीण, जर्णी पोपकॉन मशीन, झिरो बजेट प्रोजेक्टर इत्यादी प्रात्येक्षिकांनी अनेकांची मने जिंकली.
या प्रदर्शनास बहुसंख्येने पालक व विध्यार्थी उपस्थित होते. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इन्स्टिट्यूटचे प्रा. विशाल वाघमोडे, प्रा. विवेक कांबळे, प्रा. गणेश दहीटनकर, प्रा. नंदकिशोर वलटे, प्रा. जायभाय सर, प्रा. सुतार सर, प्रा. जाधवर सर, प्राध्यापिका रजनी मॅडम, प्रा. जगताप मॅडम यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वलटे सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. निकत सर यांनी केले.




