प्रतिनिधी/संजय साखरे


मांजरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. बिभीषण शिवदास चव्हाण यांची तर व्हाईस चेअरमन पदी श्री. पोपट दत्तु पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या सोसायटी च्या निवडणुकी मध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र येत गट-तट विसरून सर्वच्या सर्व १३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यापुढेही हीच परंपरा कायम राखुन स्थानिक निवडणुका बिनविरोध करण्याचा कायमच प्रयत्न केला जाईल. तसेच कार्यक्षम व्यक्तीना संधी देऊन प्रत्येक घटकांना न्याय दिला जाईल आणि करमाळा तालुक्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्याने प्रयत्न करू असे मत मा. श्री. संतोष आप्पा पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी नुतन चेअरमन यांचा सन्मान माजी आमदार श्री. जयवंतराव जगताप यांचे निवासस्थानी त्यांचे हस्ते संपन्न झाला व नुतन चेअरमन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मांजरगावचे युवानेते मकाई सह. साखर कारखान्याचे संचालक श्री. संतोष (आप्पा ) पाटील, माजी चेअरमन श्री. आप्पा चव्हाण, माजी सरपंच श्री. बाळासो मोरे, तात्या मोरे, प्रगतशील बागायतदार श्री. संतोष इंगळे, सोसायटी चे सचिव श्री. निखिल रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.




