-->
करमाळाराजकियराज्य

तालुकास्तरीय समित्या नेमताना डिकोळे यांनी महिला आघाडीला डावलले; शिवसेना महिला आघाडीचा आरोप

जिल्हाप्रमुख डिकोळे यांच्याकडील करमाळा तालुक्याचा कारभार काढून घ्यावा; करमाळा शिवसेना महिला आघाडीची मागणी

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

 

मुंबईत गेले की जय महाराष्ट्र म्हणायचे व जिल्ह्यात आले की आमदार शिंदे बंधूंचा विजय असो या प्रवृत्तीने काम करणारे करमाळा माढा विभागाचे शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे हे शिवसेना पक्षात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असून त्यांच्याकडील करमाळा तालुक्याचा कारभार काढून घ्यावा. अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या प्रियंका गायकवाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 

 

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना पक्षात ग्रामीण भागात महिला कमी कार्यरत असताना तसेच आम्ही आमच्या परीने पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करीत असताना आम्हाला काम करताना धनंजय डिकोळे हे अडचणी निर्माण करीत आहेत. शिवसेना महिला आघाडी ज्या ज्या वेळी स्वतः हुन पक्ष कार्य करण्यास पुढे सरसावते त्या त्या वेळी डिकोळे हे जाणीवपूर्वक कामात आडकाठी आणून काम करू देत नाहीत. मला विचारल्याशिवाय कोणत्याही सामाजिक कार्यक्रम करायचे नाहीत तसेच कोणी काही बोललेले असल्यास सुद्धा आंदोलन करायचे नाही अशी धमकी सातत्याने देत असतात. तसेच मोबाईलच्या पेजवर, पोस्टरवर निष्ठावंत शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो न टाकता त्यांचे निकटवर्तीयांचे फोटो टाकण्याबाबत ही आडमुठी भूमिका घेत असतात.

 

 

पुढे बोलताना गायकवाड म्हणाल्या की, शिवसंपर्क मोहिमेचे फॉर्म महिला आघाडीकडे दिले नाहीत. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत वार्ड तिथे महिला शिवसैनिक या मोहिमेअंतर्गत नोंदणी कार्यक्रम चालू केले. यावेळी डिकोळे यांनी मला फोन करून शिवसंपर्क मोहीम ही फक्त जिल्हाप्रमुखांचा कार्यक्रम आहे. महिला आघाडीचा यात काही संबंध नाही. तुम्ही शिवसेनेचे नावावर कोणतेही कार्यक्रम घेऊ नका जिल्ह्यात शिवसेनेचा कोणता कार्यक्रम घ्यायचा याचा मला अधिकार असून शिवसेनेची संपर्क मोहीम आम्हाला सुरू करण्यास आडकाठी केली.

तालुकास्तरीय समिती निवडताना महिला दक्षता समिती, नगरपालिका दक्षता समिती, संजय गांधी निराधार योजना, अंगणवाडी सेविका भरती समिती या मुख्य समितीत एकाही महिला आघाडीच्या सदस्याला स्थान दिले नाही.

 

पालक मंत्री दत्ता मामा भरणे यांनी ४ समितीचे अध्यक्षपद शिवसेनेला व ३० सदस्य शिवसेनेचे विविध कमिट्या घेऊ असे सांगितले होते. मात्र शिवसेनेत गटबाजी करून स्वतःचे महत्त्व वाढवायचे या भूमिकेत काम करणाऱ्या धनंजय डिकोळे यांनी जाणीवपूर्वक सर्वसामान्य शिवसैनिकांना पदे मिळू दिली नाही. संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांना संपर्क केला तर पक्षातून हाकलून देईल अशी दमदाटी शिवसैनिकांना सातत्याने केली जाते. डिकोळे यांच्या हुकूमशाही कारभाराबाबत मी वरिष्ठांशी संपर्क साधला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

 

जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांचा कारभार चांगला आहे. अशा पद्धतीची पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या नावे निवेदन तयार करून त्याच्यावर स्वाक्षरी घेण्याचा कार्यक्रम धनंजय डिकोळे यांनी आपल्या बगलबच्चे मार्फत करमाळा तालुक्यात सुरू केला आहे. त्याच्यावर निष्ठावान शिवसैनिकांनी सह्या करू नयेत. असे आवाहन प्रियंका गायकवाड यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close