-->
करमाळाराजकियसामाजिक

निमगाव (ह) साठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत १ कोटी १५ लाखाचा निधी मंजूर

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून निमगाव (ह) ता. करमाळा ग्रामपंचायतीला गावांतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजुर झाली आहे. यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी विशेष प्रयत्न करून नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केलेली आहे. निमगाव (ह) येथील जुनी पाणी पुरवठा योजना वारंवार नादुरुस्त होत होती. यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वारंवार खंडित होत होता. यामुळे सरपंच लखन जगताप, उपसरपंच श्रीकांत निळ, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा नीळ या सर्वांनी माजी जि.प. सदस्य नानासाहेब नीळ यांच्या मार्फत आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. निमगाव (ह) ग्रामपंचायतीला जलजिवन मिशन योजनेतून ०१ कोटी १५ लाख २७ हजार ४७३ रुपये निधी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सहकार्याने मंजूर झाल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नानासाहेब नीळ यांनी माहिती दिली.

निमगाव (ह) ग्रामपंचायतीला जलजिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच टेंडर प्रक्रिया करून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले जाईल. यामुळे निमगाव च्या पाणीपुरवठ्याचा मार्ग सुलभ झाला आहे. करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी निमगाव साठी एका वर्षामध्ये जवळपास ०३ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे. याबद्दल आमदार साहेबांचे निमगाव (ह) ग्रामस्थांकडून खूप कौतुक होत आहे.

यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमोल भोसले, उपसरपंच श्रीकांत नीळ, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ हलकारे, राजाभाऊ शिंगण, आजिनाथ जगताप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत जगदाळे, दादासाहेब भोसले, सुभाष रोकडे, तानाजी जगदाळे, सिद्धेश्वर जगदाळे, संतोष जगताप, नितीन जगताप, हनुमंत नीळ, धनंजय नीळ, गणेश नीळ, बाळासाहेब नीळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आजपर्यंत पाहता गावचा विकास थांबलेला होता. परंतु, आमदार संजय मामा शिंदे यांच्या रूपाने आमच्या गावाला चांगली दिशा मिळाली असून गाव विकासाच्या प्रगती पथावर आहे. निमगाव (ह) चे सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य व ग्रामसेवक आ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. थोड्याच कालावधीमध्ये मामांनी निमगाव (ह) साठी भरपूर निधी दिलेला आहे. त्याबद्दल आमदार शिंदे यांचे आम्ही निमगाव ग्रामस्थ ऋणी आहोत.
श्री. नानासाहेब नीळ,
माजी जि.प. सदस्य

आ. संजयमामा शिंदे यांच्याकडून विविध योजनेअंतर्गत मिळालेला निधी

कोळगाव-निमगाव-गौंडरे रस्ता ०२ कोटी रुपये, जलजिवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना ०१ कोटी १५ लाख २७ हजार ४७३ रुपये, दलित वस्ती विकास कामासाठी १२ लाख ५० हजार रुपये, महादेव मंदिर सभामंडप बांधण्यासाठी ०७ लाख रुपये, जन सुविधा योजने अंतर्गत ०२ लाख ५० हजार रुपये.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close