-->
करमाळाराजकियसामाजिक

“निर्भीड पत्रकार पुरस्कार” हा नक्कीच मोठी प्रेरणा देत राहील- सुशिल गायकवाड

निर्भीड पत्रकार पुरस्काराने सुशिल गायकवाड सन्मानित

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

प्रत्येक व्यक्ती मध्ये एक पत्रकार दडलेला असतो. अन्याय झाला की तो आपोआप जागा होत असतो. निर्भीड असणे, राहणे, जगणं हे स्वतःलाच नव्हे तर दुसऱ्यांना सुध्दा सुरक्षित करत असतं. पत्रकारिता ही निर्भीड तर असावीच पण योग्य लिहित राहणे, सत्याची कास धरणे, वास्तवादी विचार मांडणे हे पत्रकारितेच्या माध्यमातून जरी करता आले तरी आपण आपल्या पत्रकारितेशी प्रामाणिक राहून कार्य करत आहोत याचे समाधान नक्कीच असते. मला पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशनने दिलेला “निर्भीड पत्रकार पुरस्कार” हा नक्कीच अजून जबाबदारी पूर्वक काम करण्यास मोठी प्रेरणा देत राहील. असे युवा पत्रकार सुशिल गायकवाड यांनी म्हटलेले आहे.

पाडेगाव (नेवसेवस्ती) ता. फलटण येथील पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशन यांच्या कडून युवा पत्रकार सुशिल सुदर्शन गायकवाड यांना “निर्भीड पत्रकार पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महापुरुष जयंती महोत्सव सप्ताहात सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील “निर्भीड पत्रकार पुरस्कार” सुशिल गायकवाड यांना देण्यात आला. हा पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. निर्भीड पत्रकार पुरस्काराचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, झाडाचे रोपटे आणि पुस्तक अशा स्वरूपात हा सन्मान करण्यात आला.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती अशोकराव खरात, पाडेगावच्या लोकनियुक्त सरपंच स्मिताताई खरात, सुदाम बनकर, अरविंदभाऊ ढावरे, सुरवडीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी राऊत, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, संग्राम शेळके-पाटील आदी मान्यवर तसेच पाडेगाव ग्रामस्थ, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार सुशिल गायकवाड दूरदृष्टी ठेवणारा एक युवा पत्रकार घडत आहे. सत्याला सत्य बोलणारा हा पत्रकार कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाही. सत्य कथन करताना थांबत नाही. आज लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशा पत्रकारांची गरज आहे. या निर्भीड पत्रकाराचा सन्मान करताना आम्हांला समाधान वाटत आहे. असे गिरीश बनकर यांनी म्हटले आहे. “निर्भीड पत्रकार पुरस्कारा” बद्दल पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकार सुशिल गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केलेले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close