-->
करमाळाराजकियसामाजिक

करमाळा तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील; आ. संजयमामा शिंदे यांचे अर्जुननगर येथील कार्यक्रमात प्रतिपादन

 

प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण

विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यामध्ये सातत्य असायला हवे. रस्ते, वीज, पाणी या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या आहेत. या समस्यावरती तात्पुरता उपाय शोधण्याऐवजी आपण कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील असून करमाळा तालुका शाश्वत विकासाकडे येण्यासाठी काही वेळ लागेल. परंतु रिजल्ट निश्चित मिळतील असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी अर्जुननगर येथील आ. संजयमामा शिंदे गट प्रवेश व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप होते.

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, शेतामध्ये पाणी आले की समृद्धी आली असे होत नाही. पाण्यानंतर वीज ही शेतकऱ्यांची महत्त्वाची गरज आहे. पुढील ५ वर्षाचा आराखडा डोळ्यापुढे ठेवून करमाळा मतदारसंघांमध्ये विजेची समस्या भेडसावणार नाही. या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भागांमध्ये नव्याने सबस्टेशन मंजुरीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोळगाव या ठिकाणी 5Mv चा नवीन ट्रांसफार्मर बसविण्याचे काम लवकरच मंजूर होईल. तसेच आवाटी व राजुरी येथे नव्याने सबस्टेशन उभारणी ही कामे प्रस्तावित आहेत. तसेच सौंदे, वांगी, पोमलवाडी आदी ठिकाणी सबस्टेशन होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब अडसूळ यांनी केले. यावेळी उमेश मगर, दादासाहेब सांगडे, ॲड. अजित विघ्ने, चंद्रकांत सरडे, शितल शिरसागर, विलास पाटील, प्रकाश थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कै. नामदेवराव जगताप यांच्यापासून विकासाची प्रक्रिया तालुक्‍यांमध्ये सुरू असून त्याचा वेग वाढविण्याचे काम आमदार संजयमामा शिंदे यांनी २०१९ पासून केले आहे. त्यांच्या प्रत्येक कामात आपले कायमस्वरूपी सहकार्य असणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

याप्रसंगी तानाजी बापू झोळ, ॲड. राहुल सावंत, सुजित बागल, बाळूनाना जगदाळे, भरत अवताडे, संदीप नेटके, प्रदीप दौंडे, अशोक काटोळे, राहुल कुकडे, समाधान दौंड, समाधान भोगे, स्नेहल अवचर, रूपाली अंधारे, सागर अंधारे यांचेसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर्व भागात माजी आमदार नारायण पाटील गटाला भगदाड

पूर्व भागामध्ये नारायण पाटील गटाची पकड मजबूत होती. परंतु या वर्षभरामध्ये पूर्व भागात पाटील गटाला मोठे भगदाड पडले आहे. यामध्ये हिवरे येथील उमेश मगर, फिसरे येथील संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच अर्जुननगर येथील आज झालेला प्रकाश थोरात यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा प्रवेश, पांडे येथील नाना अनारसे या युवा नेतृत्वाने आमदार शिंदे यांच्या गटांमध्ये केलेला प्रवेश यामुळे माजी आमदार पाटील गटाला पूर्वभागात मोठे भगदाड पाडन्यामध्ये विद्यमान आमदार संजयमामा शिंदे गटाला यश आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close