-->
करमाळाराजकिय

विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया, रिझल्टला वेळ लागेल; जाहीर प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात आ.शिंदे यांचे प्रतिपादन

 

 

प्रतिनिधी/संजय साखरे

 

 

करमाळा तालुक्यातील विकास कामांनी २०१९ पासून वेग घेतला असून तालुक्याच्या पूर्व भागाला संजीवनी देणारा दहिगाव उपसा सिंचन योजना सारखा प्रश्न आपण मार्गी लावला आहे. तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून भविष्यात अतिरिक्त उसाचा प्रश्‍न सोडविण्यावर आपला भर असेल. विकासाची प्रक्रिया सतत चालली पाहिजे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून रिझल्ट येण्यासाठी वेळ लागतो, पण तो शाश्वत असतो. असे प्रतिपादन करमाळा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी केले.

 

 

शुक्रवार दि. २२ एप्रिल रोजी अर्जुननगर येथील सरपंच सौ. अश्विनी थोरात व त्यांचे पती प्रकाश थोरात यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी पाटील गटाला सोडचिठ्ठी देऊन आमदार संजय मामा शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी आमदार शिंदे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप होते.

 

 

अधिक बोलताना ते म्हणाले की, भविष्यात म्हसेवाडी तलावाचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच या भागातील वीज, पाणी, शाळा, रस्ते यासारखे प्रश्न त्वरित सोडवण्यावर आपण भर देणार आहे. प्रकाश थोरात यांनी ज्या विश्वासाने शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्याप्रमाणे त्यांचा विश्वास सार्थ ठरवून आम्ही विकास कामे करू असेही त्यांनी सांगितले.

 

 

यावेळी यावेळी चंद्रकांत सरडे, दादा साबळे, ॲड. अजित विघ्ने, भरत अवताडे, अशोक पाटील, अण्णा साळुंखे, तानाजी बापू झोळ, रमेश मगर, देवीदास वाघ, विवेक येवले, विक्रमसिंह शिंदे, किसन क्षीरसागर, माधुरी भोगे, बापूराव गायकवाड, सुजित बागल, समाधान भोगे, सुभाष तनपुरे, अशोक पाटोळे, वीर सर, देवा कोळेकर, चोरमले, विकास बनकर, प्रकाश थोरात, त्रिंबक ननवरे, बापू पवार, सिंधू लोखंडे, रावसाहेब पवार, भाऊसाहेब आडसुळ, विलास नवले, चंद्रकांत आतकरे, नितेश पाडोळे, दत्ता हांडे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close