प्रतिनीधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या अर्जुननगर ग्रामपंचायती च्या सरपंच सौ. अश्विनी प्रकाश थोरात तसेच ग्रामपंचायत सदस्य बापू ढवळे, त्रिंबक ननवरे, भाऊसाहेब आडसूळ या सदस्यांसह पांडे गावचे युवा नेते नाना अनारसे यांचा उद्या आमदार संजयमामा शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार असून या कार्यक्रमाला आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अर्जुननगरचे सरपंच प्रतिनिधी प्रकाश थोरात यांनी दिली.
प्रवेश सोहळा आणि पूर्व भागातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी करमाळा तालुक्यातील आमदार संजयमामा शिंदे यांना मानणारे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात विलास ननवरे, माजी सरपंच सुनील लोखंडे, सरपंच प्रतिनिधी प्रकाश थोरात, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब पवार, माजी ग्रा. सदस्य चंद्रकांत आतकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटूळे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष उद्धव पाटूळे, युवा नेते अनिल पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता हांडे, युवा नेते कुंडलिक आतकरे, दादासाहेब ननवरे, बाळूनाना अडसूळ हे सर्व प्रवेश करणार आहेत. हा कार्यक्रम मारुती मंदिरा समोर सायं. ०६:०० वाजता संपन्न होणार आहे.
पंचक्रोशीतील आमदार शिंदे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन अर्जुननगर ग्रामपंचायती च्या वतीने करण्यात आले आहे.
विकासाच्या मुद्द्यावर आमदार शिंदे गटात प्रवेश- प्रकाश थोरात
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी अर्जुननगर तसेच मसेवाडी तलावाला नियमितपणे मिळावे. अर्जुननगर गावच्या शिव रस्त्यांचा प्रश्न सुटावा. या विकासाच्या मुद्द्यावरती आपण आमदार शिंदे यांच्या गटात प्रवेश करत असून आमदार शिंदे यांची कार्यपद्धती सर्वांना सामावून घेणारी आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच न्याय मिळेल.




