प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा येथील श्री कमला भवानी देवी मंदिर महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान असून या देवस्थानच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकास निधी मिळवून देऊ. असे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने देवस्थान ट्रस्ट कडे एक लाख रुपये देणगी देत असल्याचे जाहीर केले.
आज खासदार शिंदे यांनी करमाळा येथे येऊन आई कमला भवानी देवीचे दर्शन घेतले त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, माजी सरपंच दादासाहेब पुजारी, प्रसाद पुरानिक, श्याम पुरानिक, व्यवस्थापक घाटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, अंबरनाथ चे माजी नगरसेवक आईवळे यांनी मिळून खासदार श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केला.
यावेळी संपूर्ण मंदिराची खासदार शिंदे यांनी पाहणी करून तीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या वास्तू शिल्पाचे चांगल्या पद्धतीने जतन करण्याचे दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन केले. यापूर्वीही राज्याचे नगरविकास मंत्री शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांनी कमला भवानी देवीचे दर्शन घेऊन चांदीची तलवार श्री कमलादेवी चरणी अर्पण केली होती. सैराट चित्रपटाचे बहुतांशी चित्रीकरण या कमलादेवी मंदिराच्या परिसरात झाले होते याचा ही आवर्जून उल्लेख खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला.




