-->
करमाळासामाजिक

हिवरे जि. प. शाळेत डॉ.अंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 

करमाळा (प्रतिनिधी)

हिवरे ता करमाळा येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत डाॅ बाबासाहेब अंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समती अध्यक्ष शंभुराजे फरतडे व उपाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मकाईचे माजी संचालक रघुनाथ फरतडे सरपंच सौ .सुनीता माळी उपसरपंच दिलीप फरतडे यांच्यासह भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे माजी सरपंच बापु फरतडे माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल फरतडे आबा डौले, सोमनाथ ओहळ जेष्ठ नागरिक विठ्ठल ओहळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळेस जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या डाॅ बाबासाहेब अंबेडकर यांचे जिवन चरित्र या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणातून बाबासाहेबांचे विचार आचार व कार्याची माहिती दिली.

उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक सुग्रीव निळ यांनी केले तर, उपस्थितांचे आभार सहशिकक्षक निळकंठ हनपुडे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिकक्षक जालिंदर हराळे,सुरेश शिंदे ,सुर्यवंशी, खरात , लहु चेंडगे कुलकर्णी मॅडम व अंकुश माने यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close