-->
करमाळा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा व माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यातील निवडीचा कार्यक्रम माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील गोविंद वृद्ध आश्रम येथे उत्साहात संपन्न झाला. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष मा. डि टी आंबेगावे साहेब यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा अध्यक्ष आप्पा लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडी करण्यात आल्या असून सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी सोमनाथ खंडागळे, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष पदी आशाताई चांदणे, जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी विजयाताई कर्णवर, जिल्हा महिला सचिव पदी प्रमिला जाधव तसेच माळशिरस तालुकाध्यक्षपदी शशिकांत कडबाने, उपाध्यक्षपदी किरण शेंडगे, माळशिरस तालुका सचिव पदी किरण येडगे व माढा तालुका अध्यक्ष पदी कुंदन वजाळे, तालुका उपाध्यक्षपदी सिद्धनाथ सावंत, करमाळा तालुका अध्यक्षपदी अंगद भांडवलकर, उपाध्यक्षपदी धनंजय पाटील, तालुका सचिवपदी अक्षय वरकड, तालुका सरचिटणीस पदी हर्षवर्धन गाडे अशा प्रकारे विविध निवडी संपन्न झाल्या.

यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांनी मार्गदर्शन केले की, पत्रकारांवर होणारे अन्याय सहन केले जाणार नाहीत तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व संस्थापक अध्यक्ष मा डि टी आंबेगावे साहेब आपल्या पाठिशी कायम उभा आहेत. त्यामुळे कोणी पत्रकारांबद्दल अपमानास्पद वागणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही असा इशारा देण्यात आला. तसेच जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्षांनी संघटना वाढीसाठी तन, मन व धनाने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पुढील काळात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व शहरांत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या शाखा उघडल्या जाणार आहेत अशी ग्वाही सोमनाथ खंडागळे यांनी दिली.

यावेळी राजकुमार डांगे, संजय चांदणे उपस्थित होते तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृद्धाश्रमातील वयोवृध्द महिला व नागरिकांना फळे वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close