-->
करमाळाक्राईमराजकिय

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थान वर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी – शंभुराजे फरतडे ( युवा सेना तालुका समन्वयक )

प्रतिनिधी /ऋषिकेश चव्हाण

एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थान वर झालेल्या हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी युवासेना करमाळा तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात फरतडे यांनी म्हटले आहे की
काल न्यायालयातील झालेल्या निकालानंतर एस टी कामगार व त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जल्लोष साजरा केला होता. संप मिटून कामगार कामावर रुजु होतील अशी शक्यता होती मात्र आज दुपारी चार च्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानात हजारो कर्मचारी बेकायदेशीर जमाव जमवून घुसले व चप्पल फेक व दगडफेक केली.

संविधाना नुसार सर्वांना आंदोलन करण्याचा कायदेशीर आधिकार आहे मात्र एखाद्या जेष्ठ नेत्यांच्या घरावर बेकायदेशीर घुसून दगडफेक चप्पल फेक करणे हे महाराष्ट्राच्या संस्काराला शोभत नाही.या ठिकाणी सुप्रिया सुळे या हात जोडून विनंती करत असताना देखील आंदोलक आरेरावीची भाषा वापरत होते. हे चिंताजनक आहे. या आंदोलनास कोणाची फुस आहे ,कोणी चिथावणी दिली .याचा निःपक्ष पणे शोध घेतला पाहिजे.

कामगारांच्या बाबतीत महाराष्ट्रातील जनता संवेदनशील होती .परंतु आंदोलनाचे राजकीय रुपांतर पाहता हे आंदोलन भरकटले गेले. आज न्यायालयीन निकालानंतर एकीकडे कामगारांचे वकिल गुणरत्न सदावर्ते आनंदोत्सव साजरा करतात व एकीकडे कामगार कायदा हातात घेऊन शरद पवार यांच्या घरावर हल्ला करतात याचा अर्थ काय काढायचा? एस टी कामगार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोण राजकारण करीत असेल, कामगारांच्ये आयुष्य
उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते निषेधार्थ आहे.

मराठाआरक्षणसाठी अनेक मराठा बांधवानी बलिदान केले.लाखोंचे मोर्चे निघाले मात्र कोणीही चुकीचा शब्द देखील काढला नाही मात्र या आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांकडून हे धाडस कशाच्या जोरावर झाले याची सीबीआय मार्फत कसुन चौकशी करावी व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून महाराष्ट्राची आंदोलन चळवळ बदनाम करणाऱ्यांना धडा शिकवावा आशी मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close