-->
करमाळाराजकियसामाजिक

पोमलवाडी ते चांडगाव या दरम्यानच्या पुलासाठी आ.संजय शिंदे यांचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साकडे

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

काल दिनांक ५ एप्रिल रोजी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजयमामा शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची दिल्ली येथे भेट घेऊन करमाळा तालुक्यातील पोमलवाडी ते इंदापूर तालुक्यातील चांडगाव यादरम्यान पुलाचे बांधकाम व्हावे या ड्रीम प्रोजेक्टसाठी साकडे घातले.

यासंदर्भात आमदार शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा मतदारसंघातील मौजे पोमलवाडी, ता. करमाळा जि. सोलापूर ते चांडगाव, ता. इंदापूर जि. पुणे यादरम्यान भीमा नदी पात्रावर पूल उभारण्याची मागणी होत असून हा पूल झाल्यास गोवा- कोल्हापूर- सातारा- फलटण- नातेपुते- वालचंदनगर- लोणी देवकर चांडगाव ते पोमलवाडी- कोर्टी- करमाळा- राशिन- अहमदनगर- औरंगाबाद असा मार्ग जोडला जाणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडला जाईल. वस्तुतः या दोन्ही गावांचे मधील अंतर हे ७३७.३९५ मीटरचे असून दोन्ही बाजूला अप्रोच रस्ते पूर्वीपासून आहेत. त्यामुळे भूसंपादनाची कोणतीही आवश्यकता भासणार नाही.

सदरचा पूल अस्तित्वात आल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्था व दळणवळण वाढीस लागणार आहे व या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. बाजारपेठा जवळ आल्याने उद्योगधंद्यांना चालना मिळणार असून रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. या भागातील शेती व शेतीपूरक व्यवसाय यांना यामुळे चालना मिळेल. या भागात पर्यटनाला देखील उपलब्धी असून मध्य रेल्वेचा मार्ग आणि NH 65 हा राष्ट्रीय महामार्ग फक्त ७ किमी अंतरावर येणार आहे.

आज या ठिकाणी दिवसभर लॉन्चद्वारे प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालत असून यासाठी आपल्या स्तरावरून या महत्त्वाकांक्षी पुलासाठी निधी उपलब्ध झाल्यास हा एक विकास मार्ग, पर्यटन मार्ग ठरणार आहे. सदरचा पूल (ब्रिज) साठी स्थळपाहणी होऊन निधी उपलब्ध व्हावा ही विनंती. अशा आशयाचे पत्र आमदार शिंदे यांनी गडकरी साहेबांना दिलेले असून यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close