-->
राजकियराज्य

सणसवाडीतील पाणीटंचाई ऐन उन्हाळ्यात संपली; आ.अशोक पवार यांच्या पाठपुराव्याला यश

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

सणसवाडी (ता.शिरूर) येथील पाझर तळे नुकतेच आमदार अशोक पावर यांच्या प्रयत्नाने पाण्याने तुडुंब झाले, त्यामुळे सणसवाडी करांचा पाण्याचा प्रश्न सुटला, शेती व रहदारीला मोठा फायदा, जगताप तळे, हरगुडे वस्ती तळे, भुजबळ वस्ती तळे हे तीन तळेही पाण्याने तुडुंब भरले असल्याचे जिल्हा नियोजन समती सदस्य पंडित दरेकर यांनी सांगितले आहे.

 

मागील दोन वर्षापासून जगताप तळे व हरगुडे तळे काही कारणास्तव कोरडे पडले होते. आमदार अशोक पवार यांनी सदर घटनेच्या समस्यावर सणसवाडी ग्रामपंचायत तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांसोबत चर्चा करत सदर तलावांचा प्रश्न मार्गी लावला. आमदार पवार यांच्या प्रयत्नाने तळी पाण्याने तुडुंब भरले. सणसवाडी ग्रामपंचायत, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी आमदार अशोक पवार यांचे आभार व्यक्त केले.

 

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडितआप्पा दरेकर, उपसरपंच सागर दरेकर, मा. उपसरपंच विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ हरगुडे, ग्रा.स. राजेंद्र दरेकर, दगडु दरेकर, माजी सरपंच रमेश सातपुते, नवनाथ दरेकर, चेअरमन सुहास दरेकर, बाबा दरेकर, रामदास दरेकर, रामभाऊ दरेकर, नवनाथ हरगुडे, सतीष दरेकर, हनुमंत दरेकर व ग्रामस्थांनी सदर तलावांची पाहणी केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close