-->
करमाळासामाजिक

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर उस्फुर्तपणे संपन्न

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

महिला वर्ग संपूर्ण आयुष्यात विविध भूमिका बजावत असताना त्यांना इतरांच्या गरजा भागवता भागवता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळ नसतो परंतु यापुढील काळात गावातील महिलांसाठी आरोग्य शिबिराच्या बरोबर महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कोरेगाव भीमा ग्रामपंचायत च्या विद्यमान सदस्या अर्चना निखिल सुपेकर यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथे आर्चरी ची नॅशनल चॅम्पियन श्रुती संपत गव्हाणे व ग्रामपंचायत सदस्या अर्चना सुपेकर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिरात कोरेगाव भीमा व परिसरातील असंख्य महिला व मुलींनी सहभाग नोंदविला.

यावेळी उपसरपंच शिल्पा फडतरे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा गव्हाणे, सविता घावटे, शैला फडतरे यांच्यासह ज्योती ढेरंगे, धनश्री ढेरंगे, कोमल ढेरंगे, अलका भोसले, शिल्पा ढेरंगे, सोनाली इंगळे, पूजा चौधरी, प्रतिक्षा गव्हाणे, प्रतिभा सव्वाशे, स्वाती सव्वाशे, कल्याणी ढेरंगे, माजी उपसरपंच आशा काशीद, माया वाघमारे, कावेरी मोरे, रुपाली ढेरंगे, धनश्री घावटे, राणी पोटफोडे, दिव्या गव्हाणे, अंकिता सव्वाशे, हर्षदा काशीद, मोहिनी फडतरे, माजी सरपंच मंगल फडतरे, अलका घावटे, शोभा गव्हाणे, मनीषा सासवडे, पूजा शिंदे, बेबी शिंदे, नंदिनी शिंदे, राणी भोकरे, संगीता भोकरे, सारिका कांबळे, अपर्णा घटमल, प्राजक्ता सुपेकर, शीतल गायकवाड, प्रीती गव्हाणे, वैशाली घावटे, तेजश्री फडतरे, स्वाती गव्हाणे, अनिता गव्हाणे, अंजली घावटे, प्रीती गव्हाणे, काजल गव्हाणे, राणी गव्हाणे, लीलावती वाघमारे, जोसना सुपेकर, हर्षदा सुपेकर, शुभांगी दौंडकर, प्रिया सुपेकर, चारुशीला मांझीरे, तेजश्री फडतरे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

यावेळी महिलांसाठी विविध प्रकारच्या आरोग्य विषयक तपासण्या मोफत करून महिलांना विविध आजारांचे विषयी बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी सह्याद्री हॉस्पिटल च्या डॉ. श्रद्धा विचारे, सिस्टर सुधा त्रिभुवन, सुमित माने, शिवाजी पाटील आदींनी सहकार्य केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close