-->
करमाळाविशेषसामाजिक

कौतुकास्पद: शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयापूर्वीच पोमलवाडी जि.प. शाळेत बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

शाळेच्या आवारामध्ये आक्षेपार्ह, लैंगिक अत्याचारांच्या घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, वस्तीगृह तसेच सर्व खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. शाळांनी या कॅमेऱ्यांचे हार्डडिस्क सांभाळणे अनिवार्य आहे. या विषयी यंदाच्या वर्षी प्रक्रिया सुरू केली जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी सांगितले होते. परंतु या निर्णया अगोदरच पोमलवाडीच्या मराठी शाळेत युवा सरपंचांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

 

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील पोमलवाडी या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला सहा महिन्यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. या बाबत पोमलवाडी गावचे माजी सरपंच युवा नेतृत्व संग्राम सुर्यकांत पाटील यांनी महत्वाचा पुढाकार घेतला असुन ग्रामविकास अधिकारी तानाजी येडे, सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थांचे सहकार्यातुन हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.

 

पोमलवाडी ग्रामपंचायतीने केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचे आमदार श्री. संजयमामा शिंदे, गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत, सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश करे पाटील, करमाळा तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. अजित विघ्ने तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close