-->
करमाळाराज्यविशेष

संजय घोरपडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित; जि.प. अध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

 

करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, भारत हायस्कूल मध्ये विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. संजय घोरपडे यांना ‘आदर्श शिक्षक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे उपस्थित होते.

 

 

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. दरवर्षी जिल्ह्यातील काही निवडक शिक्षकांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार करमाळा तालुक्यातील जेऊर येथील श्री. घोरपडे यांना देण्यात आला आहे. या अगोदर देखील घोरपडे यांना केंद्र स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून विशेष कौतुक होत आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा जिल्ह्यातील मोहोळ येथे पार पडला.

 

 

यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. संजय घोरपडे यांचे करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या प्रसंगी शामराव जवंजाळ, दिलीप स्वामी (मुख्याधिकारी), अनिरुध्द कांबळे (जिल्हा परिषद अध्यक्ष), दिलीप चव्हाण (जिल्हा परिषद उपाध्यक्ष), किसन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close