धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त “राजा शिवछत्रपती” या ग्रंथाचे वितरण
माय मराठी न्युज नेटवर्क


धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज बलिदान मास निमित्त ममदापुर ता. येवला येथे शिवव्याख्याते जानकीदास वैष्णव (आळंदी) यांचे संकल्पनेतुन शिवस्वराज्य ग्रुप चे वतीने श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे लिखित “राजा शिवछत्रपती” या ग्रंथाचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण पाटिल देवरे यांचे हस्ते शिवछत्रपती मूर्ति पूजन करून उपस्थितांसमोर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बजरंग दलाचे ता. सयोजक अण्णासाहेब सोमासे हे बलिदान मास निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशासाठी, धर्मासाठी तसेच समाजातील तरुण पीढ़ीसाठी आजही शिवशंभुचरित्र ग्रंथ हे बहुअनमोल आहेत आणि ते घरोघरी असावेतच असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी दत्तु खिल्लारे, दादासाहेब शिरसाठ, मछिन्द्र साबळे, बाळासाहेब सपकाळ सुभाष जाधव, रामकृष्ण मते, मारुती शिरसाठ, शंकर गुडघे, डॉ. तात्यासाहेब दाने, भाऊसाहेब धनवटे, भैय्या शिरसाठ आदि मान्यवर व शिवशंभू प्रेमींच्या उपस्थित शिवशंभु वंदना आणि उद्घोष करून कार्याची सांगता करण्यात आली.




