माय मराठी न्युज नेटवर्क


साताऱ्यात पसरणी तालुक्यात वाईमध्ये भैरवनाथ नगर येथे साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक धोम धरणाच्या डाव्या कालव्यात कोसळला. ऊस वाहतूक करणाऱ्या या ट्रकचे चाक खड्ड्यात अडकून ट्रक कालव्यात कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकाचे व संबंधित ऊस असलेल्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
रस्ता अरुंद असल्याने ट्रकचे चाक खड्ड्यात अडकले आणि ट्रक एका बाजूला कलंडला. ट्रक चालकाने आपल्या परीने ट्रक वाचविण्याचे प्रयत्न केले पण तो यामध्ये अपयशी ठरला. या अपघातात ट्रक ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे.
अरुंद रस्त्यामुळे ट्रक एका बाजूला झुकून कालव्यात जाऊन कोसळला कालवा समितीला याची माहिती मिळताच कालव्यातील पाण्याची पातळी कमी करून रात्री उशिरा ट्रक कालव्यातून बाहेर काढण्यात आला.




