
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेली आरोग्य सेवा आज करमाळ्यात आली असून या माध्यमातून सर्व सामान्यांना मदतीचा आधार मिळेल असा विश्वास माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केला. या शिबिरामध्ये आज दिवसभरात एकूण ९४७ रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले आहे. तर ३२९ जणांना मोफत चष्म्याचा लाभ मिळाला असून ४० जणांची मोफत ईसीजी तपासणी करण्यात आली आहे.
यावेळी मकाई सह. साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, पं.स. सभापती अतुल पाटील, युवा नेते शंभुराजे जगताप, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, मार्केट कमिटीचे संचालक देवानंद बागल, प्राचार्य जयप्रकाश बिले, यश कल्याणीचे चेअरमन गणेश करे पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष बापू घोलप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड, नगरसेवक अतुल फंड, महादेव फंड, प्रशांत ढाळे, कन्हैयालाल देवी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, जय युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे, डॉ. रोहन पाटील, डॉ. शेलार, महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रियंकाताई गायकवाड, चिंतामणी दादा जगताप, सतीश निळ, कल्याणराव सरडे, आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल डुकरे, डॉ. मोटे, डॉ. राहुल कोळेकर, डॉ. भोसले भाजपचे दीपक चव्हाण, शिवसेनेचे अनिल पाटील, ठेकेदार शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
सोमवार दिनांक ०७ मार्च रोजी सकाळी १०:०० ते सायं. ०५:०० वाजेपर्यंत मोफत चष्मे वाटप, मोफत ईसीजी तपासणी व मोफत औषधे वाटप होणार असून याचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल बोलताना म्हणाले की, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद असून कोरोना काळात करमाळा तालुक्यातील जनतेच्या मदतीला शिवसेना धावून आले.
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, कोरोना च्या काळात शिवसेनेने हातावर पोट असलेल्या चारशे लोकांना, मजुरांना दररोज दोन वेळचे जेवण दिले. जवळपास दोनशे वीस रुग्णांना रेमेडीसिवीर इंजेक्शन मोफत दिले. शेकडो कुटुंबांना अन्नधान्य मोफत दिले.



