माय मराठी न्युज नेटवर्क


जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून माघारी निघालेल्या भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात होऊन या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव रोडवरील गिगाव फाट्यावर घडली आहे. चाळीसगावहून मालेगांवच्या चांदनपुरी येथील खंडेराव महाराज यांच्या दर्शनासाठी तसेच गोंधळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून भाविक येत असतात.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हा कार्यक्रम आटोपून हे भाविक चंदनपुरीहून निघाले तेव्हा चाळीसगाव गाव रोडवरील गिगाव फाट्यावर हा अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १५ जण जखमी झालेले आहे. तर टेम्पोला मागून धडक दिल्यानं तो पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना मालेगाव जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
या दुर्घटनेतील सर्व अपघातग्रस्त हे चाळीसगाव तालुक्यातील असून ते चंदनपुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर परत जाताना अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त वाहनातून ३० जणं प्रवास करत होते. अपघातग्रस्त जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघात ग्रस्त लोक हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा या गावचे असल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी यानंतर वाहतूक सुरळीत केली आहे. तर, अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून बाजूला करण्यात आहे. अपघातग्रस्त वाहनातून ३० लोक प्रवास करत होते. तसेच अपघातग्रस्तांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.




