वडगाव शिंदे – काकडे च्या उपसरपंच पदी योगिता शिंदे बिनविरोध निवड
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


योगिता मच्छिंद्र शिंदे यांची नुकतीच वडगाव शिंदे – काकडे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. उषा हरिभाऊ काकडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विद्यमान सरपंच हेमलता विलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी योगिता शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक दयानंद कोळी यांनी योगिता शिंदे यांची उपसरपंच पदी निवड झाली असल्याचे जाहीर केले.
यावेळी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत नवनिर्वाचित उपसरपंच योगिता शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच युवराज काकडे, बाळासाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्या शिवानी शिंदे, उल्का शिंदे, दीपाली शिंदे, संगीता काकडे, उद्योजक कल्याण (आबा) शिंदे, विलास शिंदे, माजी सरपंच रमेश काकडे, विजय शिंदे, विकास शिंदे, भरत काकडे, राम काकडे, उद्योजक स्वप्नील शिंदे, हरिभाऊ काकडे, वैभव शिंदे, युवराज काकडे, मच्छिंद्र शिंदे, बाबासाहेब काकडे, ज्ञानेश्वर बारणे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
हवेलीच्या माजी सभापती अनुसया बारणे यांच्यासह इतर मान्यवरांनी योगिता शिंदे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. गावातील स्ट्रीट लाईट, स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते तसेच महिला बचत गट, स्वयंरोजगार आदी उपक्रम ग्रामस्थांसाठी राबविणार असल्याचे यावेळी योगिता शिंदे यांनी सांगितले.



