-->
आरोग्यकरमाळासामाजिक

बिर्याणी खाणे बेतलं जीवावर, चिकन बिर्याणीने घेतला तरुणाचा बळी.?

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

खराब अन्न खाल्ले किती त्रास होतो याचा अनुभव प्रत्येकाला येतो. त्यामुळे प्राण देखील जाऊ शकतात असे म्हटले तर आश्चर्य वाटेल. मात्र अशीच घटना औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात घडल्याची समोर आली आहे. खराब चिकन राईस खाल्ल्याने लिव्हरवर परिणाम झाला आणि त्यामुळे सचिन पिछोरे या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

एका खाजगी कंपनीत काम करणारा सचिन पिछोरे हा चुलत भाऊ संतोष पिछोरे सोबत गावाकडून येऊन कामानिमित्त वाळूज परिसरात राहात होता. सचिन ने संतोष ला फोन करून आपला डबा आज आला नसल्याने चिकन राईस घेऊन येत असल्याचे सांगितले. काही वेळातच तो रूमवर गेला. त्यावेळी सचिन आणि संतोष दोघांनी चायनीज चिकन राईस वर ताव मारला. दुसऱ्या दिवशी सचिनला उलटी मळमळ होऊ लागली असता तो तपासणीसाठी हेडगेवार रुग्णालयात आला. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र आपण असेच बरे होऊ असे सचिनला वाटले आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास वाढल्याने तो पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. लिव्हर वर जास्त परिणाम झाल्याने रक्त गोठण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली होती. त्यामुळे रक्त खूप जास्त पातळ झाले होते. उलटीमधून, तोंडातून, लघवीतून स्कीनमध्ये रक्त उतरले होते. दोन वेळा प्लास्मा देऊनही परिणाम न झाल्याने सचिनचा मृत्यू झाल्याची माहिती हेडगेवार रुग्णालयाचे तज्ञ डॉ. आनंद पाठक यांनी दिली आहे.

सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र संतोष थोडक्यात बचावला आहे. सचिनने रूमवर बिर्याणी मागवली त्यावेळी मेडिकल दुकानावर काम करणाऱ्या संतोषने देखील बिर्याणी खाल्ली होती. त्यामुळे सचिनसोबत संतोष ला देखील त्रास झाला होता. मात्र संतोष चा डब्बा आलेला असल्याने त्याने कमी प्रमाणात चिकन राईस खाल्ली होती. त्यामुळे त्याला त्रास कमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. पाठक यांनी दिली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close