आदिनाथ बाबत चर्चा, आंदोलन करण्यापेक्षा चालू करणाऱ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य करावे- सचिन काळे

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मंदिर म्हणून ओळखला जाणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा वाचला पाहीजे. संपूर्ण करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मत फक्त कारखाना सुरळीत चालावा हेच आहे. कारखाना हा फक्त आंदोलन किंवा चर्चा करून चालू होनार नाही तर तो कोणी चालवनार आहे त्या चालवणाऱ्याला प्रतिसाद दिला पाहीजे. आत्ता कारखाना कोण चालविणार किंवा कोण चालविण्यासाठी घेणार हे महत्वाचे नाही तर तो कोणी तरी चालू केला पाहीजे. तसेच कारखाना चालू करणाऱ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य केले पाहीजे. असे वक्तव्य करमाळा युवा सेनेचे माजी तालूका प्रमूख श्री. सचिन काळे यांनी केले आहे.
या वेळी पुढे बोलताना सचिन काळे म्हणाले की, आदिनाथ कारखाना या अगोदर सुद्धा चालू होता होता. पण सध्या कारखाना चर्चा, मिटींग, आंदोलन, कारखाना विरोधातील वक्तव्य व बातम्या तसेच करमाळा तालूक्यातील राजकारणाचा बळी ठरला आहे. लक्षात घ्या आदिनाथ कोण घेणार आहे किंवा कोण चालविणार आहे. याच्याशी सर्वसामान्य शेतकरी व सभासदांना काहीच मतलब नाही. फक्त कारखाना चालू झाला पाहीजे हेच शेतकऱ्याच उद्दीष्ट आहे. कारखान्याचा एक सभासद व शेतकरी म्हणून माझे सुद्धा हेच मत आहे.



