
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


मांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. उज्वला स्वप्नील पाटील व पालक सौ. विदया निखील बागल यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत साईराज कांबळे व जिजामाताच्या वेशभूषेत शांभवी बागल, आर्या गुटाळ, स्वामीनी पोतदार, उत्कर्षा बागल, स्वरा अवचर होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. उज्वला पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणासाठी पाच झाडांची रोपे शाळेस देण्यात आली.
यावेळी स्वरा अवचर , यश बागल, स्वराज पाटील, ध्रुव गुटाळ, आर्या गुटाळ, सम्राज्ञी बागल, शांभवी बागल, साईराज कांबळे, अनुष्का बागल, वरद बागल, देवराज बागल या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जिवनावर मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष पोतदार, नागेश बागल, हिरामण कौले, वैशाली पवार, सुवर्णा महामुनी, आशा देमुंडे, अंगणवाडी सेविका शोभा मारवाडी, वैशाली बागल, इंदूमती शिंदे, अनिता अवचर उपस्थित होते. आभार आशा देमुंडे यांनी तर स्वागत सुवर्णा महामुनी यांनी केले.




