-->
करमाळासामाजिक

पांगरे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील पांगरे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम ग्रामपंचायतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विधीवत पूजा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळेमधील मुलांना खाऊ वाटप करून शिवजयंती साजरी केली. त्यानंतर शिवजयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच प्रतिनिधी ॲड. दत्तात्रय सोनवणे, उपसरपंच गणेश वडणे, माजी उपसरपंच सचिन पिसाळ, सदस्य महेश टेकाळे, विवेक पाटील, सचिन गायकवाड, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जोतिराम गाडे पाटील, तुकाराम पिसाळ, महेश शेळके, बापू दोंड, सतीश भगत, भाऊ टेकाळे, बापू पिसाळ, सुशांत वडणे, नाथा काळे, नाथा उघडे, पोलीस पाटील युवराज सावंत, मनोहर लांडे, पांडुरंग उघडे, त्याचबरोबर ग्रामसेवक समाधान कांबळे, कर्मचारी गोपाळ कोळी, मच्छिंद्र उघडे, अंगणवाडी कर्मचारी आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close