
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


अखंड हिंदुस्थानाचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९२ वी जयंती पूर्ण देशामध्ये साजरी होत आहे. या दिवशी विविध उपक्रम राबवून आपल्या राजाला अभिवादन केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील खडकेवाडी मध्ये देखील शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थांनी ही जयंती साजरी केली आहे.
हिसरे गावातील शिवकन्या राजेश्वरी जगदाळे हिने प्रतिमेचे पूजन केले आहे. गावातील अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी मनोगत व्यक्त केले आहे.
सध्या देशावर कोरोनाचे मोठं संकट आलं आहे. या संकटापासून सुटका करण्यासाठी देखील यावेळी प्रार्थना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप शिंदे यांनी मांडले. तर प्रमुख पाहुण्यांचे आभार शिवजन्मोत्सव समितीने मानले आहेत.



