-->
आरोग्यकरमाळाराजकियसामाजिक

माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून नियमित रक्तदान केल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम होतो. सध्या कोरोना काळात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन वाघोली येथील मोझे कॅम्पसचे डीन विजय राठी यांनी केले.

 

वाघोली, ता. हवेली येथे गेनबा सोपानराव मोझे ट्रस्ट चे पार्वतीबाई गेनबा मोझे इंजिनिअरिंग आणि गेनबा सोपानराव मोझे फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. या शिबिरात विद्यालयातील तब्बल २५० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

 

रक्तदान शिबिराचा शुभारंभ कॅम्पसचे डीन विजय राठी, डॉ. एम. जी. जाधव, डॉ. राजेश ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत मुलांचे बरोबरच मुलींनी देखील रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला.

 

सदर रक्तदान शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन प्रा. गुरुप्रसाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम मुल्ला, प्रतीक सातव, प्रमोद ढमढेरे, राधिका सोमाने, स्वाती सिंग, स्नेहल हसे, अश्विनी जाधव, विशाल पाटील, समीर पवार, निखिल भुजबळ, संग्राम जाधव, तन्मय होन, ट्विंकल शुक्ला यांनी केले. तर पुना ब्लड बँक चे डॉ. कमलेश डिंबळे, डॉ. इंदल जैसवाल यांच्या सहकार्यांनी मुलांच्या रक्ताची तपासणी करत रक्तदानासाठी सहकार्य केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close