-->
करमाळासामाजिक

Breaking: उंदरगाव परिसरात दिसला बिबट्यासदृष्य प्राणी; ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन

 

प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान बाळूमामा मंदिर परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसला आहे. उंदरगावचे सरपंच श्री. हनुमंत नाळे यांनी स्वतः बिबट्या सदृश्य प्राणी पहिला असल्याची माहिती दिली आहे.

उंदरगाव येथील बाळूमामा मंदिर परीसरतील श्री. सरडे यांच्या शेतामध्ये बिबट्या सदृश्य प्राणी दिसला आहे. उंदरगावचे सरपंच हनुमंत नाळे यांनी हा बिबट्या स्वतः पाहिलेला आहे. तरी गाव व परिसरातील सर्व नागरिकांनी सावध राहावे. तसेच काही संशय आल्यास लागलीच परिसरातील किंवा आपल्या घराजवळील इतर व्यक्तींना सावध करावे. आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. आपली जनावरे शक्यतो गोठ्यामध्ये किंवा कंपाऊंडच्या आत राहतील याची काळजी घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close