प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


वढू खुर्द, ता. हवेली ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच नवनाथ विनायक पवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच सीमा भंडलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मोहिनी सचिन भोंडवे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी नवनाथ पवळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक दादाभाऊ नाथ यांनी जाहीर केले.
यावेळी माजी सरपंच माऊली चोंधे, अनिल चोंधे, माजी उपसरपंच नितीन भोंडवे, नवनाथ पोटफोडे, अजित भंडलकर, सरपंच मोहिनी भोंडवे, उद्योजक सचिन भोंडवे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुनील ठुबे, पोलीस पाटील मच्छिंद्र भोंडवे, सोमनाथ चोंधे, शिरूर हवेली प्रासादिक दिंडीचे माजी अध्यक्ष विलास खांदवे, ग्रामपंचायत सदस्य रसिका चोंधे, शंकर काकडे, महेंद्र खांदवे, रामदास भंडलकर, कोमल धुळे, वंदना दरेकर, शालेय समितीचे अध्यक्ष खंडू भोंडवे, पोलीस मित्र प्रवीण ढवळे, मंगेश भंडारे, नरेंद्र पवळे, दत्ता पोटफोडे, खंडू गोलांडे, गौरव भोंडवे, ओंकार भंडलकर, रमेश भंडलकर, कैलास पवळे, स्वप्नील भोंडवे, दादासाहेब भोंडवे, सर्जेराव पवळे, सुरेश चोंधे, रतन जाचक, मधुकर भंडलकर, प्रकाश चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक डुकरे, संजय सोपान पवळे, संतोष पवळे, हनुमंत भोंडवे आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
सदर निवडीनंतर वढू ग्रामस्थांच्या वतीने नवनाथ पवळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तर गावातील रस्ते, लाईट, स्वच्छता, वृक्षारोपण या मूलभूत गरजांच्या बरोबरच पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासनाच्या वतीने जास्तीत जास्त निधी गावाच्या विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच नवनाथ पवळे यांनी यावेळी सांगितले.



