-->
आरोग्यकरमाळासामाजिक

अभिनव माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात लसीकरण शिबिर संपन्न

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

 

 

करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील अभिनव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूवार दिनांक ०३ फेब्रु. २०२२ रोजी लसीकरण योजनेचे आयोजन गटशिक्षणाधिकारी श्री. राजाराम भोंग साहेब, विस्तार अधिकारी श्री. अनिल बदे साहेब, संस्था अध्यक्ष श्री. आबासाहेब झोळ, सचिव प्रा. महादेव झोळ व प्राचार्य रणजित कादगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या पार पडले.

 

 

 

 

लसीकरणासाठी वाशिंबे उपआरोग्य केंद्रातील आरोग्य समुदाय अधिकारी श्री. हजारे साहेब यांच्यासह श्री. गायकवाड, श्री. थोरात, श्रीमती. काळे, श्रीमती. धुमाळ, श्रीमती. जगदाळे, श्रीमती. गायकवाड या सर्व आरोग्य समुदाय टिमने लसीकरणाचे कार्य पाहिले. या लसीकरण मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रमाणित केलेल्या लसी मेंदू ज्वर व को- वैक्सीन या लसीचा वापर करण्यात आला.

 

 

 

लसीकरणानंतर सर्व आरोग्य टिमच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष श्री. आबासाहेब झोळ, प्राचार्य रणजित कादगे सर प्राथमिक विभाग प्रमुख अनिता जाधव मॅडम, श्री. गोरख गुल्मर सर, श्री. निलेश जाधव सर, श्री. प्रमोद हराळे सर, प्रा. पंकज शिंदे सर, प्रा. यशवंत पवार सर, प्रा. उमेश सांगळे सर , प्रा. दामाजी शेळके सर प्रा. मंगेश साखरे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज शिंदे सरांनी तर आभार प्रदर्शन प्रा. यशवंत पवार सरांनी केले. व लसीकरण मोहिम यशस्वी रित्या पार पडली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close