-->
महिलाविषयकराज्य

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिला आज आघाडीवर- माजी सभापती संजीवनी कापरे

 

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवन प्रवासात मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्यामुळे आज मुली व महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेण्याची गरज असल्याचे मत हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती संजीवनी कापरे यांनी व्यक्त केले.

 

 

पेरणे फाटा, ता. हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमारे वस्ती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात कापरे बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंतरा भोसले ही विद्यार्थिनी होती.

 

प्रतिमा पूजन माजी सभापती संजीवनी कापरे, मुख्याध्यापिका भारती चव्हाण, इतर मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे हस्ते करण्यात आले. स्वागत गायकवाड यांनी केले. मीनाक्षी धामणे यांना “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार” मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

जयंतीनिमित्त शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. सुत्रसंचलन किंजल बचुटे हिने तर आभार संध्या गायकवाड हिने मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close