-->
क्राईममहिलाविषयकराज्य

गुरु-शिष्य नात्याला काळिमा; खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

 

एका शिक्षकाने खासगी क्लासमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. पीडित मुलगी शिक्षणासाठी येत असताना आरोपी नराधम शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थिनीने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नराधम शिक्षका विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 

 

आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. किशोर मामडगे असे अटक करण्यात आलेल्या नराधम शिक्षकाचे नाव असून तो लातूर शहरातील शिकवणी परिसरात इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग घेत आहे. २६ डिसेंबर रोजी वर्गात आलेल्या अल्पवयीन मुलीवर आरोपी मामदगे याने लैंगिक अत्याचार केला.अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

 

 

पीडिते विद्यार्थीनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी २६ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे मामाडगे यांच्या खासगी शाळेत गेली होती. यावेळी आरोपीने पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने घरी येऊन हा प्रकार आईला सांगितला.

 

 

यानंतर पीडितेच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी किशोर मामडगे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये काही संशयास्पद आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close