करमाळा
केम येथील डॉ. विलास दोशी यांचे अल्पशा आजाराने निधन
केम प्रतिनिधी/संजय जाधव


केम तालुका करमाळा येथील डॉ. विलास नेहालचंद दोशी यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांचे वय वर्ष ७६ होते. त्यांनी केम येथे नाममात्र फि घेऊन ३२ वर्ष रूग्णांची सेवा केली. त्यांची केम व परिसरात डाॅ. गुजर या नावाने ओळख होती.
दोशी कुटुंबावर हा दुसरा आघात आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी डॉ. विलास दोशी यांचे वडिल नेहालचंद वालचंद दोशी यांचे निधन झाले होते. अजून सहा महिने होत नाही तोपर्यंत दोशी कुटूंबावर हा दुसरा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, चार भाऊ, सुन, बहिण व नातवंडं असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केम गावावर शोककळा पसरली आहे.




