-->
करमाळासामाजिक

सोमवती अमावस्या निमित्त केम येथील उत्तरेश्वराच्या मूर्तीला खंडेरायाची सजावट

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये आज सोमवती अमावस्या निमित्त शिवलिंगाला खंडेरायाच्या रूपात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. या मध्ये देवाला खंडेरायाची भरजरीत पगडी घालण्यात आली होती. हळदीचा मळवड भरण्यात आला व खांदयावर घोंगडी तसेच चंगाळे घातले होते.

 

आज भाविकाना जेजुरीच्या खंडेरायाचे साक्षात दर्शन झाले. त्यामुळे भाविकांना प्रसन्न वाटले. जणू काही आपण आज जेजुरीत आहोत आणि जेजुरीच्या खंडेराया चे दर्शन घेत आहे असे वाटले. ही सजावट मंदिराचे पुजारी बाळू गुरव, गणेश गुरव, व भैय्या मोकासी यानी केली तर यासाठी तुषार शिंदे, केदार पळसकर, बबलू पाटिल या भाविकानी परिश्रम घेतले.

 

या सजावटीचे श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे, सदस्य मनोज सोलापूरे, विजय तळेकर, मोहन दौंड तसेच श्री ऊत्तरेश्वर देवस्थान चे मंहत जंयत गिरी महाराज यानी कौतुक केले. हि सजावट पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close