-->
करमाळाराजकियसामाजिक

आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शेलगाव (क) येथील डांबर प्लांटचे उद्घाटन

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा मतदारसंघांमध्ये जिल्हा हद्द कोर्टी विहाळ वीट करमाळा पांडे सालसे आवाटी ते उस्मानाबाद जिल्हा हद्द या रस्त्याचे काम एन. पी. इन्फ्रा प्रो. प्रा. लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून अशियाई विकास बँक च्या अर्थसहाय्यातून सुरू आहे. या कंपनीच्या डांबर प्लांटचे उद्घाटन आज सकाळी ११:०० वा. आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. जयवंतराव जगताप हे होते.

 

डांबर प्लांट च्या उद्घाटनप्रसंगी आमदार शिंदे म्हणाले की, दौंड काष्टी बार्शी उस्मानाबाद रा.मा. ६८ या रस्त्यात करमाळा तालुक्यातील जिल्हा हद्द कोर्टी ते जिल्हा हद्द आवाटी इथपर्यंत ५०.५४ कि.मी चा भाग येतो. यामध्ये जवळपास १० कि. मी. लांबीचा रस्ता वन विभाग व माळढोक अभयारण्यातून जात असल्यामुळे सदर रस्त्याच्या कामासाठी अडचण येत आहे. या अडचणींमध्ये आपण लक्ष घातले असून मा. जिल्हाधिकारी यांना वनविभागास पर्यायी वनेतर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण पत्र दिले असून हुलगेवाडी येथील गट नंबर 2 मधील गायरान जमीन देण्यासाठी नाहरकत प्रस्ताव दिलेला आहे. सदर रस्ता वेळेत पूर्ण करण्यावर व दर्जेदार काम करण्यावर एन.पी. इन्फ्रा कंपनीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, उप अभियंता उबाळे, कंपनीचे कार्यकारी संचालक नितीन तापडिया, माजी जि.प. सदस्य उद्धव दादा माळी, वामनदादा बदे, तानाजी झोळ, चंद्रहास निमगिरे, रामचंद्र काटूळे, दत्ता जाधव, भास्कर भांगे, मानसिंग खंडागळे, भरत अवताडे, सुजित बागल, विवेक येवले, सरपंच अशोक काटूळे, बाळासाहेब जगताप, सौंदेचे सरपंच गायकवाड, उपसरपंच उमेश वीर, उपसरपंच सचिन वीर, राजेंद्र पवार तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विकास वीर यांनी केले. तर आभार अशोक भांडवलकर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close