प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


मिरवडी, ता. दौंड ग्रामस्थ, वृक्षप्रेमी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने “एक मित्र एक वृक्ष” असे ४०० देशी वृक्षारोपण करण्यात आले. तर या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला पक्ष्यांचे जूसबार हे नाव देण्यात आले. मिरवडी ग्रामपंचायतीने सार्वजनिक लोकसहभागातून गावच्या हद्दीतील विविध ठिकाणी मागील वर्षभरात ५६ विविध प्रकारच्या तब्बल २८०० झाडांची यशस्वी लागवड पूर्ण केली आहे.
वृक्षारोपण करत असताना ग्रामपंचायत मिरवडीच्या वतीने परिसरातील यशस्वी व्यक्तींचा सन्मान करत त्यांच्या ही हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी ACP किरण सोनवणे, उपहिंद केसरी पै. तुषार डुबे, पोलीस नूरजहाँ शेख, वन अधिकारी शिवकुमार बोंबले, एक मित्र एक वृक्ष ग्रुप, मानाजीनगर युवा मंच पणदरे (बारामती) यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, मिरवडी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सह ग्रामस्थ, युवा सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




