केम प्रतिनिधी/संजय जाधव


कण्वमुनी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कंदर तालुका करमाळा येथील प्रशालेत आज बुधवार दिनांक २६ जानेवारी रोजी भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात तसेच कोरोनाचे सर्व शासकीय नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ स. सा. का. चे माजी संचालक व संस्थेचे संचालक नवनाथराव भांगे (मालक) तर प्रमुख पाहुणे म्हणून टेंभुर्णी ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक मोनाली पवार मॅडम उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे सचिव प्रा. सुनील भांगे सर प्रशालेचे प्राचार्य श्री. वसंतराव नलवडे सर, पर्यवेक्षक फंड सर, संस्थेचे संचालक भानुदास आबा भांगे, विलास माने, अतुल पाटील, रामभाऊ भगत तसेच सदाशिव रोमन, संतोष सुरवसे, पोपट पवार, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. शिवसमर्थ उद्योग समुहाचे अध्यक्ष किरण यादव यांच्या कडून गरजू विद्यार्थ्यांसाठी ५ डजन वह्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.डी. बल्लाळ सर यांनी केले.




