-->
राज्यविशेष

स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य संघटन सरचिटणीस पदी ॲड. संजय सावंत पाटील यांची निवड

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

स्वच्छ भारत अभियानाच्या महाराष्ट्र राज्य संघटन सरचिटणीस पदी ॲड. संजय सावंत पाटील यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन गजानन देशपांडे, स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्य संयोजक धनंजय दगडे पाटील उपस्थित होते.

 

 

 

विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी मध्ये ॲड. संजय दत्ताञय सावंत (पाटील) यांनी प्रवेश केला होता. तसेच पार्टीमध्ये सर्कीय कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत पार्टीने जिल्हा कमिटी मध्ये दखल घेऊन त्यांना भाजपा कायदा आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी जबाबदारी दिली आहे. गेली दिड वर्षापासून भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा वकील आघाडीचे नेतृत्व करत पार्टीमध्ये निष्ठेने काम करत असताना असेच काम महाराष्ट्र राज्यात स्वच्छ भारत अभियान चे काम प्रत्येक जिल्हा, तालुका, शहरात, गावोगावी प्रामाणिकपणे करतील याच अपेक्षेने अभियान मध्ये दखल घेऊन ॲड. संजय सावंत पाटील यांना संघटन वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य संघटन सरचिटणीस जबाबदारी दिली आहे.

 

 

सामाजिक संस्था व संघटना भारतीय मिडीया फाऊंडेशन, अँन्टि करप्शन कमिटी, शिवक्रांती युवा परिषद, जगदंब सामाजिक प्रतिष्ठान, माहिती सेवा समिती मध्ये महाराष्ट्र राज्य प्रदेश कमिटी मध्ये गेल्या १५ वर्षापासुन सामाजिक कामात सर्कीय आहे.

 

 

 

द एमराल्ड रिसोर्ट हाँल, सोमाटणे फाटा, मावळ, पुणे याठिकाणी स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणी ची निवड करण्यात आली. स्वच्छ भारत अभियान प्रमुख कार्यकारणी, लोकसभा, विधानसभा, जिल्हा तालुका, शहर अध्यक्ष व सरचिटणीस, संयोजक व सहसंयोजक, जिल्हा कार्यकारणी सदस्य, विशेष निमंत्रित इत्यादी नियुक्तीपत्र देण्यात आली.

 

 

ॲड. संजय सावंत पाटील यांनी सांगितले की, भारत सरकार व भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणानुसार संपुर्ण महाराष्ट्राभर चांगली टिम बनवून अभियानची संकल्पना सर्वसामान्य पर्यत पोहचवणार असून प्रत्येक वस्ती, गाव, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आव्हान करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close