-->
राज्यविशेषसामाजिक

जिल्हा परिषद शाळेस दिव्या गव्हाणे यांचेकडून शैक्षणिक व खेळाच्या साहित्याचे वाटप

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

अनावश्यक खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपत कोरेगाव भीमा येथील दिव्या संपत गव्हाणे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय सराव प्रश्न संच, हसत खेळत चा संच तसेच फुटबॉल, बॅडमिंटन चे साहित्य भेट देऊन सामाजिक उत्तरदायित्व जपत विद्यार्थ्यांना अमूल्य भेट दिली.

 

 

भाजपचे शिरूर तालुका सरचिटणीस संपत गंगाराम गव्हाणे व कोरेगाव भिमा ग्रामपंचायत सदस्या मनीषा गव्हाणे यांची कन्या दिव्या संपत गव्हाणे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने एक कृतीयुक्त आदर्श ठेवला आहे. दिव्या गव्हाणे ही विद्यार्थिनी विज्ञान च्या द्वितीय वर्षाचे नौरोजी वाडिया महाविद्यालय पुणे येथे शिक्षण घेत आहे. दिव्या विविध स्पर्धा व सामाजिक कार्यात सहभागी होत असते. कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाबासकी व आशीर्वाद देत दिव्याच्या सामाजिक कार्याविषयी दिव्यासह कुटबियांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

 

 

यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल शहाजी गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम गव्हाणे, अनिकेत गव्हाणे, केशव फडतरे, मनिषा गव्हाणे, सविता घावटे, अर्चना सुपेकर, माजी उपसरपंच प्रकाश ढेरंगे, समीर इनामदार, मुख्याध्यापिका कुसुमलाई बांदल, सोमनाथ राऊत, सुनिल सव्वाशे, शिक्षकतज्ञ राजेंद्र गवदे, रविंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे, महेश गव्हाणे, बबलू शिंदे, करण गोरड आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close