-->
करमाळाराजकियसामाजिक

पाटील गटाला धक्का.! पश्चिम भागातील यांचा आ. संजयमामा शिंदे गटात प्रवेश.?

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

आमदार संजय मामा शिंदे यांच्या विकासकामांना प्रेरित होऊन करमाळा तालुक्यातील अनेक राजकीय पुढारी तसेच बागल व पाटील गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिंदे गटात इनकंमींग सुरूच आहे. सध्या तरी आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यात पाटील व बागल गट अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. अगोदरच तालुक्यातील अनेक भागातील कार्यकर्त्यांनी संजय मामा शिंदे गटात जाहिर प्रवेश केलेला आहे. त्यातच आता पश्चिम भागातील माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले ॲड. अजित विघ्ने हे आमदार संजय मामा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अभ्यासु आणि जाणकार नेतृत्व, करमाळा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. अजित विघ्ने यांचा मकर संक्रातीच्या दिवशी शुक्रवार दिनांक १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजता नगोर्ली येथील फार्म हाऊसवर आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे.

ॲड. विघ्ने हे केत्तुर गावचे माजी सरपंच असुन त्यांनी विविध शासकीय व निमशासकीय समितीवर काम केलेले आहे. सन २०१२ साली त्यांनी जगताप गटाकडुन पंचायत समितीची निवडणुक ही लढवली होती. शिवसेना नेते शिवाजीराव मांगले, माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, माजी मंत्री दिंगबरराव बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप, यांचे बरोबरही त्यांनी शिवसेनेने निष्ठेने काम केले आहे. सध्या ते माजी आमदार नारायण पाटील गटाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती करीता ते पाटील गटाकडून देखील इच्छुक होते.

 

भविष्यात करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आमदार संजय मामा शिंदे हे एक सक्षम नेतृत्व आहे. त्यांनी अनेक वर्षापासून रखडलेला पश्चिम भागातील डिकसळ पुलाचा अतिशय महत्वाचा प्रश्न सोडविला आहे. तसेच तालुक्यात सध्या चालू असलेल्या इतर विकास प्रिय मुद्द्यावर प्रभावित होवुन मी आमदार संजय मामा गटात प्रवेश करीत आहे. ॲड. अजित विघ्ने

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close