केम प्रतिनिधी/संजय जाधव


पाथुर्डी तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करून राजमाता जिजाऊसाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती तसेच सोलापूरचे चार हुतात्म्यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन उपाध्यक्ष श्री. सदाशिव तोडेकर, सदस्य अतुल वैद्य, तानाजी मोटे, समाधान खरात, मुख्याध्यापक महेश्वर कांबळे, कानडे आजोबा, उपशिक्षिका सुरेखा चौरे, कविता कांबळे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ते जिजाऊ साहेब जयंती सप्ताहानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या स्पर्धांचे बक्षीस वितरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील मोजकेच विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी माॅ जिजाऊसाहेब, स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्षा मीनाताई मोटे, उपाध्यक्ष सदाशिव तोडेकर, सदस्य अतुल वैद्य, समाधान खरात, मनीषा मोटे, मीराबाई बंडगर, माजी सरपंच बाळासाहेब मोटे, माजी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेश (आण्णा) मोटे, माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बाबीर वाघे, चव्हाण साहेब आदी पालक उपस्थित होते. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. शाळेमध्ये झालेल्या रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यार्थ्यांना लेखणीचे बक्षीस देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. महेश कांबळे यानी केले.



