
केम प्रतिनिधी/संजय जाधव


श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम ता. करमाळा, जि. सोलापूर याठिकाणी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम परमपूज्य डॉ. बापुजी साळुंखे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यानी विविध विषयावरील ग्रंथाचे वाचन करून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद, डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे, इतर विचारवंत इत्यादी ग्रंथाचे वाचन करण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून श्री. कांतीलाल दोंड, श्री. लतीब पठाण, सौ. डांगे ताई उपस्थित
होते.
या कार्यक्रमास प्राचार्य श्री. विष्णु कदम, शालेय समिती अध्यक्ष श्री. दयानंद तळेकर, प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे, प्रा. अमोल तळेकर, ग्रंथपाल श्री. भाकरे बापू व विद्यार्थी उपस्थित होते.



