
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


आज आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत मांजरगाव च्या वतीने प्राध्यापक संजय चौधरी व मकाई चे संचालक संतोष पाटील व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शहाजीराव देशमुख यांनी मांजरगाव, वांगी नं.१ च्या वतीने प्रत्येकी एक कोटी रुपये ठेवी म्हणून देण्याचे जाहीर केले जाहीर केले.
यावेळी बोलताना प्रा. संजय चौधरी म्हणाले की, आज ऊसतोडणीसाठी एकरी पाच ते सात हजार रुपये खर्च येत आहे. आज आपण नवा कारखाना उभा करतो आहे असे समजून प्रत्येक ऊस उत्पादकांनी एकरी पाच हजार रुपये प्रमाणे ठेव पावती करावी. ही आपलं भविष्य सुरक्षित करणारी आहे. आज हरिदास डांगे साहेब यांच्या मागे चाळीस वर्षाचा साखर कारखानदारीतील अनुभव आहे. वेळ प्रसंगी ते २४ तास आदिनाथ साठी काम करायला तयार आहेत. हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. तरी आता आरपारची लढाई समजून आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
यावेळी बोलताना प्रा. शहाजीराव देशमुख म्हणाले की, हा खासगी साखर कारखाना झाला तर संपूर्ण तालुक्यात साखर सम्राटांची मक्तेदारी सुरू होऊन ऊस उत्पादकांना पिळुन खाल्ले जाईल. आज खासगी कारखाने ऊस उत्पादकांना वार्यावर सोडून जिथे स्वस्त ऊस मिळेल तेथून ऊस आणत आहेत. ८० कोटी कर्जासाठी ३०० कोटी रुपयांचा कारखाना लुटण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने आपला स्वाभिमान जागृत करून या लढ्यात सहभागी व्हावे असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.
आदिनाथ कारखाना साखर कारखाना सहकार तत्त्वावरच चालू रहावा हा संपूर्ण तालुक्याचा अंतर्मनातील आवाज असून आता सभासदांनी हा निर्णय घेतला असल्यामुळे नेते मंडळींनी या निर्णयाला राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून पाठिंबा द्यावा.
प्रा. शिवाजीराव बंडगर चेअरमन, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती



