-->
करमाळाराजकियसामाजिक

आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांना यश; जळालेला ट्रान्सफॉर्मर होणार कार्यान्वित

 

प्रतिनीधी/ऋषिकेश चव्हाण

 

धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. दोन वर्षापासून कोळगाव धरण १०० % भरत आहे. परंतु पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कोळगाव सब स्टेशन वरील ट्रांसफार्मर गेल्या उन्हाळ्यापासून जळालेला आहे. त्यामुळे शेतीसाठी फक्त चार तास व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल व नुकसान होत आहे. आज आमदार संजय मामा शिंदे यांनी सोलापूर येथे महावितरणचे मुख्य अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्यासोबत बैठक घेतली असता त्यावेळी सांगळे साहेब यांनी एक महिन्यात कोळगाव सब स्टेशन येथील ट्रांसफार्मर कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले.

 

करमाळा तालुक्यातील कोळगाव सब स्टेशन वरील जळालेला ट्रान्सफॉर्मर एका महिन्यात होणार कार्यान्वित असून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुर्व भागातील शेतकऱ्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना हिवरे येथील कार्यक्रमात विनंती केली होती. त्यानंतर आज आ. संजयमामा शिंदे यांनी सोलापूर येथे जिल्ह्याचे महावितरणचे मुख्य अधिक्षक अभियंता श्री. संतोष सांगळे साहेब यांच्या सोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. यावेळी एका महिन्यात ट्रान्सफॉर्मर चालू करू असे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी सांगितले.

 

या प्रसंगी चोभे पिंपरीचे सरपंच विक्रम उरमोडे, तानाजी बापू झोळ, बाळासाहेब जगदाळे, भरत भाऊ अवताडे, मानसिंग भैय्या खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ सर, हिवरेचे माजी सरपंच उमेश मगर, मिरगव्हाणचे सरपंच पांडुरंग हाके, अर्जूननगरचे सरपंच प्रकाश थोरात, आबासाहेब सांगडे, रामचंद्र पवार, श्रीराम निळ आदी उपस्थित होते

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close