-->
करमाळाराजकियसामाजिक

आश्वासना चे गाजर दाखवण्या आगोदर संजयमामा शिंदे यांनी चार तासाचे वीज बिल माफ करण्यास भाग पाडावे – युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे

 

कोळेगाव सबस्टेशन वरील ट्रान्सफार्मर बसवुण वीज प्रश्न सोडवण्याच्या आश्वासनाचे गाजर दाखवण्या आगोदर संजयमामा शिंदे यांनी चार तासाचे वीज बिल माफ करण्यास भाग पाडावे आशी जोरदार मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका द्वारे केली असुन एक महिन्यात ट्रान्सफार्मर बरोबरच आवाटी सबस्टेशन चे काम मार्गी लावावे अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करु आसा इशारा दिला आहे

शंभुराजे फरतडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोळेगाव सबस्टेशन वरील 3/15 चा ट्रान्सफार्मर जळाल्याने पुर्व भागातील कोळेगाव, निमगाव, हिवरे,आवाटी गौंडरे या भागातील शेतकऱ्यांना गेली दिड वर्ष अवघे चार तास वीज पुरवठा करण्यात आला त्यामुळे धरणात पाणी असुन देखील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता आले नाही शेतकऱ्यांचे लाखों रुपायांचे नुकसान झाले ,पाणी धरण उषाला व कोरड घशाला आशी शेतकऱ्यांची आवस्था होती .वीज पुरवठा चार तास असताना शेतकऱ्यांचे माथी पुर्ण वेळेची वीज बिल लादण्याणत आली शेती पंपांचे कनेक्शन कट करुन पठाणी वसुली करण्यात आली.

ट्रान्सफार्मर जळाला असल्याने वाड्यावस्त्यावरील सिंगल फेज बंद ठेवण्यात आल्याने वर्षभर वाड्यावस्त्यावरील लोक आंधारत चाचपडत होते . आम्ही वारंवार ट्रान्सफार्मर बसवण्याची मागणी करत असताना आमदार संजय मामा शिंदे हे सबस्टेशन चे आश्वासन देत होते ,डिसेंबर महिन्यात “आवाटी सबस्टेशन चा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच पुर्व भागाचा वीज प्रश्न सोडविणार” अशा बातम्या देखील देण्यात आल्या दोन महिन्यात सबस्टेशन चे साधे भुमीपुजन देखील झाले नाही हे दुर्दैव असल्याचे फरतडे यांनी म्हटले आहे.

सबस्टेशन होई पर्यंत ट्रान्सफार्मर बसवुण वीज प्रश्न सोडवा आशी मागणी आम्ही वारंवार वृतपत्रातुन, निवेदन देऊन करत होतो वास्तविक वर्ष भरात सबस्टेशन पुर्ण करणे गरजेचे होते मात्र ते न करता पुन्हा एकदा ट्रान्सफार्मर चे आश्वासन आमदारांनी दिले आहे मात्र “देर आये दुरुस्त आये “या म्हणी प्रमाणे आम्ही आमदार संजयमामा शिंदे यांच्या भुमिकेचे स्वागत करतो मात्र आमदार संजयमामा शिंदे यांनी चार तास वीज देवुन पुर्ण वेळेचे वीज बिल आकारणाऱ्या महावितरण ला जाब विचारुन चार तासाचे वीज बिल कमी करुण घ्यावे आशी मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केली आहे.

तसेच एक महिन्यात ट्रान्सफार्मर बरोबरच आवाटी सबस्टेशन चे काम मार्गी लावावे अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करु आसा इशारा दिला आहे

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close